|
साधनपेटीइतर भाषांमध्ये
|
विकिपीडिया:साचेसाचे (Templates) हे अतीशय उपयोगी साधन आहे.विकिपीडियावर काही संदेश अथवा माहिती सारखी वापरावी लागते. असे संदेश व माहिती साच्यात घालून ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो.इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात. हा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो.साचा पाने इतर पानात वापरता येतात त्यामुळे साचा पानातील माहिती इतर एक किंवा अनेक पानात एकाच वेळी प्रतिबिंबीत[१] होते. साचांचा उपयोग विविध पानात वैवीध्यपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नावहा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा .अर्थात वर दिलेल्या साचाचा वाक्यातील उपयोग उदाहरणा दाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साचाचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलाला तर वाक्यातील अर्थाचा अनर्थ होण्याची भिती असते. साचा:helpme हे सुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे.तांत्रीक अडचणीबद्दल मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्या करता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो. नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे Category:Templates येथे एकत्रित केले आहेत.
[संपादन] साचे कसे बनवावे?[[साचा:साच्याचे नाव]] असे लिहा (साचा बनवताना साचा पुढे अर्धविरामाचे : हे चिन्ह वापरून साचाचे नाव लिहावे.: चिन्ह चूकीने विसर्गाचे चिन्ह बनले तर साचा बनत नाही म्हणून आपण मराठी सॉफ्ट्वेअर वापरत असाल तर मराठी बंद करून इंग्रजीत या चिन्हाचा वापर करून पुन्हा मराठीत वापस जा.) किंवा {{साच्याचे नाव}} याप्रमाणे दुहेरी महिरपी कंसात साच्याचे नाव लिहावे (महिरपी कंसात साचा हा शब्द लिहू नये) असा साचा आपल्याला हव्या असलेल्या विवीध सुयोग्य लेखात एकाच वेळी वापरता येतो. साचे साधारणता लेखातील हेडींगच्या भागात वाचकांना सूचना संदेश देण्या करता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वे केलेला आढळतो. साचा पद्धतीचा उपयोग विकिपीडियातील इंग्रजी सॉफ्ट्वेअर मधील सुचना मराठी किंवा संबधीत भाषेत दिसाव्यात म्हणून पण केला जात असे. अर्थात सध्याच्या पद्धतीत हीच संकल्पना MediaWiki नामविश्वाच्या स्वतंत्र स्वरूपात वापरली जाते. माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन साचांमध्ये सारणी (टेबल्स) चा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामूळे साचे बन्वताना सारणी कशी बनवावी हे सिकून घेणे उपयूक्त ठरते. काही साचे अधिक तांत्रिक कौशल्य वापरून बनवलेले तसेच त्यांचा प्रभाव विवीध पानात/लेखात सर्वदूर पडत असल्यामुळसाधी पासून अस्तीत्वात अस्लेल्या साचांमध्ये दुरुस्त्या करताना अधीक काळजी घेण्याची आवश्यकता असते.येथे काय जोडले आहे आणि साच्याच्या आत इतर कोणते साचे आहेत , काही एचटीएमएअल लिखाण आहे का सारणी नेमकी कशी बनलेली आहे या सर्वाचा दूरूस्ती करण्यापुर्वी सवीस्तर् विचार् करावा लागतो. आपण नवीन किंवा विकिपीडिया संपादनांच्या बाबतीत अननुभवी असाल जुन्या साचां मध्ये बदल स्वतः करण्या पेक्षा तशी वीनंती चर्चा पानावर करणे अधिक सयुकतीक ठरू शकते. [संपादन] प्रगत साचेसाचा पान हे विकिपिडीया करिता वापरल्या जाणार्या मेडियाविकि प्रणालीत आंतर्न्यास पद्धतीने दुसर्या पानांमध्ये भरण्याकरीता वापरलेले पान असते. हि विकिची उपपरिपाठ/उपशिरस्ता (सबरूटीन) सुविधा #इनक्लुड स्टेटमेंट किंवा मॅक्रो सदृश्य असते.बदली/ऐवजी मुळे साचा मॅक्रो सुविधा म्हणून वापरणे शक्य होते.प्रगत साचे हा लेख इंग्रजी विकिपीडियावर अभ्यासून शक्य असेल तर मराठीत भाषांतरीत करा.
[संपादन] साचे वर्गीकरणसध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्गीकरण करून येथे एकत्रित केले आहेत.
[संपादन] साचे सुसूत्रीकरण प्रकल्पसाच्यांवर काम करण्यासाठी विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. त्याला आपण हातभार लावू शकता. [संपादन] उदाहरण प्रकारा नुसार साच्यांची यादीविकिपीडियावर संवाद साधताना विविध साचे वापरता येतात. काही साचे हे केवळ विशिष्ट लेखांतच वापरता येतात. उदा. शहर साचे केवळ शहरांवरील लेखांत वापरता येतील इतरत्र नाही. पण काही साचे अनेक वेळा वापरले जातात. साचे साधारणता लेखातील हेडींगच्या भागात वाचकांना सूचना संदेश देण्या करता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वे केलेला आढळतो.त्याची माहिती व ते केव्हा वापरावेत खाली दिली आहे.
[संपादन] साचाचा गैरवापर कसा शोधावा व टाळावा
^साचांमधील माहिती प्रतिबिंबीत असल्या मुळे ती इतर लेखात जतन (सेव्ह) झालेली नसते त्यामुळेच ती इतर लेखांच्या संपादकीय इतिहासात प्रत्यक्षपणे पडताळता येत नाही.पण साचा पानाच्या इतिहासात किती काळ होती हे पडताळता येते. त्या प्रमाणेच साचा एखाद्या इतर पानामध्ये कोणत्या कालावधीत होता हे पडताळता येते.अप्रत्य्क्ष पण सबळ निष्कर्ष मात्र काढता येतो.या पडताळणींचा उपयोग साचांचा गैऊपयोग टाळण्या करिता केला जातो. |